Marathi Motivational Kavita

माझी कविता. 🌺
या प्रेरणादायी कविता वाचून तुमचे मन पुन्हा नव्याने यशासाठी प्रयत्न करण्यास तयार होईल. मनाची समजून काढण्यासाठी, मनाला उभारी देण्यासाठी या मराठी प्रेरणादायी कविता (Marathi Preranadayi Kavita) (Marathi Motivational Kavita) जरूर वाचा.

एकदा माझ्यासारखं , कधी तू ही जगून बघ ... !!🍂🍂🍂

 दुःखात असताना ही , कधी खोटं खोटं हसून बघ .....🍂🍂🍂🍂🍂

स्वप्नांच्या जगात हरवताना , कधी स्वतःला सावरुन बघ .....🍂🍂🍂🍂

मनातल्या अबोल भावना , कधी शब्दात मांडून बघ .....🍂🍂🍂

सुखाचे क्षण अनुभवताना , कधी दुःखाचे ओझे वाहून बघ .....🍂🍂🍂

प्रेमाची अपेक्षा ठेवताना , कधी दुस - यांना प्रेम वाटून बघ .....🍂🍂🍂

विरहाचे गीत गाताना , कधी एकटेपणा सोसून बघ .....🎋🎋🎋🎋

आपल्यांची आठवण काढताना , कधी मलाही आठवून बघ .....🍁🍁🍁
Marathi motivational kavita
Marathi motivational kavita