Pahil prem
🌹 पहिलं प्रेम 🌹
पहिलं प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही.का?
कारण ते आपण खूपदा कधीच व्यक्त केलेलं नसत.
ते व्यक्त केल तर त्याच ओझं उतरत
प्रत्येयकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या
मुली सोबत संसार करता येत नाही.
पण ती व्यकती तुमची झालेली नाही.
तरी काय बिघडलं ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे.
खूप छान मैत्री म्हणून हे काय कमी ग्रेट फीलिन्ग आहे.
त्या वेडीला वाटते मी तिला विसरलो
पण तिला काय माहित वेळ आणि काळ बदला तरी पहिले प्रेम विसरता नाही.
ओढ आहे मनाला , त्या रेशीम गाठीची .
आस आहे मनाला , तूझ्या भेटीची .
तो क्षण ही थांबला आहे , तूझ्यासोबत जगण्यासाठी .
डोळे आहेत आतूरलेले , तूला पाहण्यासाठी .
तू येता समोर , डोळे माझे पाणावतील .
पण गालावरती खळी घेऊन , ओठही माझे खुलतील .
तूझ्यासोबत बोलताना , शब्द ओठी जूळेल का ?
शब्दा वाचून गूज मनीचे , तूला कधीतरी कळेल का ?
भेटी मधला वेळ , असा क्षणात निघून जाईल .
आठवणींचा पसारा , मनात दाटून येईल .
भेट आपली सरताना , डोळ्यात पाणी येईल .
तुझ्या भेटीची ओढ ... आयुष्यात अधुरीच राहील ....
पहिलं प्रेमाविषयीं अधिक रोचक माहिती जाणून घेण्यासाठी
watsappstatusvideos. blogspot. com या वेबसाईट वर व्हिजिट करा. आणि मित्रांना शेअर करा.
पहिलं प्रेम
माझी मी ,
आज मी माझी ..
मलाच भेटले खूप दिवसांनी ..
माझे अंतर्मन बोलते केले खूप प्रश्न विचारले
अनेकांचे निरसन केले
आज खूप दिवसांनी
माझ्यातील मला मी नव्याने जाणिले ... ..
सतत अपेक्षांच ओझं घेऊन
मी स्वतःलाच होते हरवून बसले
कितीतरी दिवसानी ..
मी स्वतःकडे आज निरखून पहिले ..
आज फक्त मी स्वतःला भेटायच ठरवलंय
स्वतःलाच नव्याने पुन्हा जाणून घ्यायच ठरवलंय ..
करावं असं सर्वानीच अधून मधून विचारावा ..
प्रश्न अंतर्मनाला
किती ओळखता तुम्ही तुमच्यातील स्वतःला .. .. ..
पहिलं प्रेम
बोलताना तुझ्याशी माझी मीच हरवून जाते ..
अनोळखी अश्या स्वप्नाच्या दुनियेत मग स्वतःला मी पाहते .. तिथे फक्त तू आणि मी असते
चंद्र हि असतो सोबतीला घेऊन चांदण्याचा घेरा ,,
सुटलेला तो मंद गार वारा छेडतो मनाच्या तारा ...
अलगद तुझ्या मीठीत हृदय सुखावून जाते
स्वप्न असलेतरी ते ओठावर हसू देऊन जाते ..
येते तेव्हा भानावर जेव्हा तू आवाज देतोस "
कुठे हरवलीस असं तू जेव्हा मला विचारतोस .
काही नाही मी इथेच आहे हेच मी सांगत असते
पण त्या दुनियेत देखील मी फक्त तुलाच पाहत असते ..
पहिलं प्रेम
या दुनियेच्या बाजारी न्याय कुणा मागू जिथे प्रेमानेच
पाठ फिरवली तिथे आधार कुणा मागू.
येता रविवार रविवार चालते
आठवणीची तलवार ।
होती अनंत जखमा राहतो मनी तुझाचं विचार ।
होतो मनाला भास परतून तू येशील आज
असे किती गेले रविवार
तू केलेस मला नाराज दे सोडून राग सारा
अशी तू रुसणार कुठवर ॥
तुझ्या आठवणीत जगतो तुला नाही.
येत का आठवण खरे आहे तुझे सारे मी तुझा आहे
कोणाचा कोण ज्याला कोणी नसते जगती त्याला नसतो कोणाचा आधार ।।
0 Comments
Hi, thanks for you subscribe to
Welcome this sites