Prem kavita

प्रेम ही एक अशी भावना आहे की व्यक्त करावी लागते.प्रेम व्यक्त करताना प्रेमाचे स्टेटस  आपण आपल्या व्हाट्सअप्प वर आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवून आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो.जर तुम्ही प्रेमावर कवितांचा (love poem शोधात असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात.आज आम्ही तुमच्यासाठी प्रेमावर कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत. यामध्ये romantic love poem,sad love poem, love poem for husband and wife,poem on love life (prem kavita इत्यादीचा कविता संग्रहात समावेश केलेला आहे.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा प्रेम कवितांचा संग्रह नक्की आवडेल.

Prem kavita no. 1

Prem kavita
🥀Prem Kavita 🥀
🌹समजवताना स्वताःला
तू ही कधी थकला असशील,🌹

विसरण्याच्या प्रयत्नात
मलाच सतत आठवत असशील,🌹


🌹माझ्या सुखासाठी स्वताःशीच कधी रुसला असशील,🌹


🌹तू ही कधी नकळत माझ्या प्रेमात पडला असशील,🌹


🌹आठवणीत माझ्या रमताना एखादी रात्र जागला असशील ,🌹


🌹पाहून मला येताना तू ही थोडा सुखावला असशील ,🌹


🌹धडधडणाऱ्या हृदयाशी एकांतात भांडला असशील ,🌹


🌹तू ही कधी नकळत माझ्या प्रेमात पडला असशील,
दुरावताना हात हातातील तू ही थोडा दुखावला असशील ,🌹


🌹अश्रू माझे पाहून तू ही मनात गहीवरला असशील ,🌹


🌹" आयुष्य माझं तूच " म्हणताना थोडसं तरी रडला असशील , ॥🌹

Prem Kavita

प्रेमकविता no. 2

Prem kavita
Prem kavita 
🥀भेट तुझी नी माझी जरा आठवून घे .. !🥀

🥀प्रीतफुलाचा गंध पुन्हा श्वासात साठवून घे .. !🥀


🥀सांजवेळी मंद वा - याचा निरोप एकदा ऐकून घे .. !🥀

🥀होऊ दे वेदना शांत मन मोकळं करून घे .. !🥀


🥀भिजलास ना पावसात तु .. जरा सरीचा आनंद घे .. !🥀


🥀नको ठेऊस वेदना मनीच्या माझ्याशी वाटून घे ..!!🥀

Prem Kavita no. 3
Prem kavita
Prem kavita 

🥀का झालं कसं              झालं
नको मला विचारू ..तुझ्याशिवाय जगण्यास

आता नको मला सांगू
खूप वाट पाहीली तुझी
अजून नको छळू
प्रेम करतोय तुझ्यावर म्हणून अंत नको पाहू ..
नाही का ग किंमत
तुला माझ्या या प्रीतीची
कळत नाही का खरच तुला भावना या मनाची ..
काय आहे तुझ्या मनात
फक्त एकदा तू सांगाव .. मनातलं प्रेम आता तू ओठांवर आणावं ...
नको राहू अबोल आता सार काही बोल मनातील प्रत्येक भावना तू माझ्या समोर                 खोल
 खूप वाट पाहिली तुझी आता उत्तर दे .. तुझ्या होकाराने माझ्या आयुष्यात आनंद तू घेऊन ये ..🥀💞🥀

Prem kavita no. 4

  
Prem kavita
Prem kavita 

विषय हा टाळलेला बरा , अन्य हाताळलेला बरा ॥


आठवांच्या फुलांतील तो मोगरा जाळलेला बरा ॥💞


हट्ट का उत्तराचा उगा ? प्रश्न रेंगाळलेला बरा ॥💞


विश्व खोटे जरी भोवती , शब्द मी पाळलेला बरा ॥💞


लावु दे पेच त्यांनाच , मी दोर गुंडाळलेला बरा ॥💞


हौस ना थांबण्याची मला , पाय भेगाळलेला बरा ॥💞


मिरव सौभाग्य तू आपुले , चंद्र डागाळलेला बरा ॥💞